मुंबई, दि. २ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव , जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ. विलास आठवले व सचिव शिवदर्शन साठ्ये यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी सचिव सुनिल वाणी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विजय कोमटवार व अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.








