spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिल्ली पब्लिक स्कूल, नागपूर येथे शिक्षकांसाठी पॉक्सो जनजागृती कार्यशाळा संपन्न

कामठी :- दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोड, नागपूर येथे जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी ‘पॉक्सो कायदा व बाल संरक्षण जनजागृती कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान शिक्षकांना बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदी, शिक्षकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या, संशयास्पद घटनांची नोंद करण्याची प्रक्रिया तसेच बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि संरक्षणात्मक शालेय वातावरण निर्माण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या माहितीपूर्ण सत्रामुळे शिक्षकांमध्ये बाल संरक्षणाविषयी जागरूकता वाढली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. प्रत्येक विद्यार्थ्यास सुरक्षित, संरक्षित व पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या शाळेच्या वचनबद्धतेला या कार्यशाळेमुळे अधिक बळ मिळाले.

Popular Articles