spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सम्राट अशोक विद्यालयाची यशस्वी भरारी

– दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी पात्रता; योगेश्वरी शेरकुरे व यश हुसेन नंदागवळी यांचे घवघवीत यश

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे 

नवेगाव बांध :- नजीकच्या उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयाने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ मध्ये विद्यालयाचे यश हुसेन नंदागवळी व कु. योगेश्वरी जनार्दन शेरकुरे हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या यशामुळे विद्यालयासह उमरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव एल. आर. भैसारे, मुख्याध्यापक सूर्यभान टेंभुर्णे तसेच एस. व्ही. बडोले, लता टेंभुर्णीकर, एच. एस. पात्रिकर, जे. एस. हटवार, एम. यू. घरोटे, गौरव चव्हाण, ठाणेदार वैद्य, बापू पंचलवार, सीमा सोनवाणे आणि सोनल झिंगरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची जिद्द, नियमित अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन हेच यशाचे खरे सूत्र असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच उज्ज्वल कामगिरी करत विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांचे यश

🔹 यश हुसेन नंदागवळी

🔹 योगेश्वरी जनार्दन शेरकुरे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ मध्ये दोन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवून सम्राट अशोक विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

Popular Articles