spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर पोलीस हेल्थ मिशनच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

– लकडगंज पोलीस ठाण्यात ९० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यची मोफत आरोग्य तपासणी

नागपूर :- भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय. एफ. पी. डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘नागपूर पोलीस हेल्थ मिशन’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या शिबिरात ९० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तशर्करा (ब्लड शुगर), हिमोग्लोबिन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिराला पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३) राहुल मदने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकही यावेळी उपस्थित होते. पोलिसांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. याप्रसंगी भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शालिग्राम भोंगळे, कोषाध्यक्षा डॉ. प्रीती भोंगळे आणि सचिव यश भोंगळे उपस्थित होते. तसेच आयएमए जेडीएनचे राज्य सहसंयोजक डॉ. सुयश, राज्य सहसचिव डॉ. बलजित, नागपूर चेअरमन डॉ. चिन्मय, महासचिव डॉ. लोकेश तसेच मोफत पॅथॉलॉजी सेवा उपलब्ध करून देणाऱ्या मिठास हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे विवेक यांनीही शिबिरात सहभाग नोंदविला.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. पोलिसांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘नागपूर पोलीस हेल्थ मिशन’ अंतर्गत भविष्यात शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच स्वरूपाचे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Popular Articles