spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हरिनाम भजन मंडळ वारकरी अभंग भजन स्पर्धेचे महाविजेते

– आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती द्वारे भक्ती सप्ताहाचा समारोप !

– भजनाद्वारे ईश्वरभक्तीची प्राप्ती- संदीप कोहळे

आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस व आषाढ पर्वनिमित्ताने आयोजित वारकरी अभंग भजन स्पर्धेत हरिनाम भजन मंडळ महाविजेते ठरले असून २१०००/- रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आला . याप्रसंगी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप कोहळे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. भजन स्पर्धेच्या माध्यमातून महिलांकडून लोक संस्कृती व राष्ट्र सेवेचा प्रचार कार्य घडत आहे असे गौरवोद्गार संदीप कोहळे यांनी काढले. याप्रसंगी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, माजी महापौर अर्चना डेहनकर, नागपूर महिला आघाडी अध्यक्ष दिव्या धुरडे , अनिल मानापुरे, वैशाली दर्यापूरकर, रेखा निमजे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत जवळपास मध्य नागपुरातील १६७ भजनी मंडळांनी सहभाग घेतला असून त्यामधील निवडीत २१ उत्तम विजेत्यां भजनी मंडळांना रोख पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक हरिनाम भजन मंडळ पाचपावली, २१०००/- , द्वितीय क्रमांक स्वरा भजन मंडळ, तृतीय सूरसुरंगिणी, चतुर्थ चंद्रघंटा भजन मंडळ, पांचवा स्वरश्री भजन मंडळ, आणि १५ उत्तेजनार्थ देण्यात आले.

स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची आहे. विठ्ठलभक्तांनी आषाढी निमित्त होणाऱ्या विठ्ठल भक्तीच्या जागरात मोठ्या प्रमाणात होते. या स्पर्धेच्या कार्यक्रमाची पसायदानाने सांगता झाली. स्पर्धेचे परीक्षण कुणाल पांडे व सुजाता खांबता यांनी केले. या स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. स्पर्धेचे यशस्वितेसाठी आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे रेखा निमजे, श्वेता निकम भोसले, सारिका नांदूरकर , कृतिका आमले, अभिजीत कठाले,दर्शन नाखते, योगेश ढबाले, धनश्री भोरकर आणि समस्त पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Popular Articles