spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री साईबाबा विद्यालयात राजेंद्र भुजाडे यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार

किशोर साहू : मौदा,ता.२ :नि:स्पृह शिक्षण संस्था निमखेडा दौरा संचालित श्री. साईबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा येथील सेवाजेष्ठ शिक्षक राजेंद्र हरिभाऊ भुजाडे हे शासकीय नियत वयोमानानुसार दिनांक 31 जुलै 2025 ला शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले.यानिमित्त निःस्पृह शिक्षण संस्था व शाळेच्या वतीने राजेंद्र भुजाडे यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि शाळेतील त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दलच्या फोटो देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांनी शाळेला दिलेल्या 31 वर्षाच्या सेवेसाठी त्यांच्या यथोचित गौरव करण्यात आला. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि देशाचे सुजान नागरिक घडले.या सत्काराप्रसंगी  भुजाडे यांनी दरवर्षी एसएससी परीक्षेत गणित विषयात सर्वात जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला 1001 रुपये बक्षीस देण्याचे घोषित केले.
या सेवानिवृत्ती  सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक नंदकुमार सरोदे, सत्कार मूर्ती  राजेंद्र भुजाडे,  प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र हटेवार, संस्थेचे सचिव आखाडनाथ नानोटकर, कोषाध्यक्ष सुनील ठाकरे, माजी मुख्याध्यापक प्रकाश टिपरे ,शिक्षण विस्तार अधिकारी भक्तवरती, सामाजिक कार्यकर्ते विनायक महादुले, सिंधुताई टिपरे, माधुरी भुजाडे, सरोदे, मुख्याध्यापक आकाश निनावे, शिक्षकवृंद रवींद्र गोयले, आशिष आरीकर,  महेश तिजारे, मोहीब सय्यद, शुभम झाडे, हेमलता मरसकोल्हे, ज्योती गजभिये, पायल ठाकरे, सुदर्शनी महादुले, साधना झाडे, अविनाश राऊत, संदेश नानोटकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बोरकर, आभार प्रदर्शन ईश्वर पत्रे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles