spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे गोंड राजे बख्त बुलंद शाह यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांना जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापौर निता ठाकरे,उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी विधान भवन चौक स्थित गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदान दिवस व चिमासाहेब भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपाच्या उपमहापौर लिला हाथीबेड यांनी रामनगर चौक स्थित शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि रघुजीनगर ताजबाग चौक येथील चिमासाहेब भोसले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे कर्मचारी, अग्निशमन जवान व नागरिक उपस्थित होते.

Popular Articles