spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आरोग्य उपकेंद्र गांगनेर येथील आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी सरपंच संकेत झाडे यांची निवड 

किशोर साहू, मौदा, ता. ५ : सोमवार (दि. 4 ऑगस्ट )ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तारसा अंतर्गत येत असलेल्या आरोग्य उपकेंद्र गांगनेर येथील आरोग्य समिती च्या अध्यक्षपदी खंडाळा (गांगनेर) चे तडफदार सरपंच संकेत झाडे यांची निवड करण्यात आली.
        नवनिर्वाचित अध्यक्ष सरपंच संकेत झाडे यांनी समिती चा आणि उपकेंद्र गांगनेर यांचा पूर्ण आढावा आज सोमवार (दि. 4 ऑगस्ट) ला  घेतला. गांगनेर येथील आरोग्य प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले कि, उपकेंद्रात ड्रॉक्टरांनी  उपकेंद्र उघडण्याच्या वेळा निश्चित करून तसे फलक जनतेच्या माहितीसाठी उपकेंद्राबाहेर लावावे. एम पी डब्ल्यू आणि आरोग्य सेविका यांनी उपकेंद्रा अंतर्गत येत असलेल्या गावात डेंगूची उगमस्थाने संपूर्णपणे नष्ट करावी. गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्यास, त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतला कळवावे. दर महिन्याला होत असलेल्या गावा गावात गरोदर माता, स्तनदा माता ,लहान बाळाला लसीकरण हे कोणत्याही प्रकारे हयगय न करता व्यवस्थीतरित्या करावे.
    उपकेंद्रा अंतर्गत कोणत्याही गावात कोणताही मुलगा कुपोषित राहायला नको. या सगळ्या व इतरही विषयावर चर्चा करण्यात आली . जे आरोग्य सेविका चांगले काम करेल त्यांची उत्कृष्ठ आरोग्य सेविका म्हणून सन्मानित करण्यात येईल असे ही निर्देश या प्रसंगी देण्यात आले. या सर्व उपकेंद्राचा इमारती ची पाहणी करून जे सुविधा या ठिकाणी करावी लागते त्याचे सुद्धा प्रस्ताव आरोग्य विभागा चा माध्यमातून शासना कडे ताबडतोब पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या .नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे  यांचा आरोग्यावर विशेष लक्ष्य असून त्यांचा माध्यमातून उपकेंद्रा ला लागणार निधी मी सरपंच व उपकेंद्राचा अध्यक्ष म्हणून पाठपुरावा करून मंजूर करून आणण्याचा परिपूर्ण कार्य करील असे आश्वासनही झाडे यांनी याप्रसंगी दिले.
            या कार्यक्रमाला  ग्रामपंचायत खंडाळा सरपंच व  आरोग्य समिती उपकेंद्र गांगनेर अध्यक्ष संकेत झाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र तारसा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली काकडे, डॉ. धीरज बाहेश्वर, गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) सरपंच अनिता चिंचूलकर, गट ग्रामपंचायत सालवा (खोपडी) सरपंच चंद्रकला हिंगे, गांगनेर उपसरपंच मोतीराम घरजाळे, नरसाळा उपसरपंच सचिन राऊत, येसंबा उपसरपंच धनराज हारोडे, एम पी डब्ल्यू वैभव डोईकर, ए एन एम अरुनिमा पराजे, आशा वर्कर  कुंदा झाडे,सुषमा अलोणे, अल्का गजभिये, नम्रता कारेमोरे, सुषमा गजभिये उपस्थित होते.

Popular Articles