spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौर निता ठाकरे यांनी केली खापरी बस डेपोची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे यांनी बुधवार (ता.१९) रोजी खापरी बस डेपो येथे सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाहणी केली. ई-बस संचलनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा तसेच प्रवाशांना सुरक्षित, नियमित व दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याच्या दृष्टीने माहिती घेण्यात आली.

यावेळी मनपा परिवहन विशेष समिती सभापती मंगला खेकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक मिलिंद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, प्रकल्प, परिवहन अभियंता पंकज पराशर, अभिजित नेताम, धर्माळे,  गजानन नागूलवार, प्रकल्प सल्लागार मेहुल रानडे, चेतन कावरे, चलो टिम खापरी डेपो येथील डिझेल व इलेक्ट्रिक बस ऑपरेटर्स व संबंधित कंत्राटदार उपस्थित होत.

पीएम ई-बस योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या 75 ई बसेस करिता आवश्यक सुविधांसंबंधित पाहणी करण्यात आली. पार्किंग व्यवस्थेसाठी केलेले नियोजन, सद्य असलेल्या बसच्या तुलनेत उपलब्ध करण्यात येत असलेले चार्जिंग स्टेशन, डेपोला आवश्यक अश्या पद्धतीची विद्युत सुविधेची पूर्तता, बसच्या देखभालीसाठी लागण्याच्या आवश्यकता सुविधा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. महापौरांनी डेपो अंतर्गत सुरु असलेल्या स्थापत्य विषयक कामाच्या स्थितीची माहिती घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करून 15 सप्टेंबर पूर्वी डेपो चे शिल्लक कार्य करण्यासाठी संबंधित अभियंत्यांना निर्देशीत केले. यावेळी कामे केवळ वेळेत नव्हे तर निर्धारित गुणवत्तेनुसार पूर्ण करण्यात यायला हवे असे निर्देशसुद्धा देण्यात आले. ई-बस संचलनासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने कामावर भर असावा असे सूचित करण्यात आले.

ई- बस सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्यात तसेच अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. प्रदूषण मुक्ततेच्या विषयावर लक्ष देऊन या मध्यमातून पर्यावरण पूरक अश्या वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करता येईल. भविष्यातील ई-बसच्या विस्ताराचा भागही लक्षात घेण्यात आला असून त्यानुषंगाने डेपोची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोणाने चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी आवश्यक सुविधा लवकर व गुणवत्तापूर्ण पोहचाव्या यासाठी परिवहन विभाग, स्थापत्य विभाग, अभियंता, प्रकल्प सल्लागार, बस ऑपरेटर आणि संबंधित कंत्राटदारांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.