spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चित्तरंजननगरात कोयता घेऊन दहशत माजविणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्तरंजननगर परिसरात हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला नवीन कामठी पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडील कोयता जप्त केला असून, आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पथक चित्तरंजननगर परिसरात गस्तीवर असताना अब्दुलाशाह दर्ग्याजवळ एक इसम हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन फिरत असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आकाश रामटेके (वय ३७, रा. चित्तरंजनदास नगर, कामठी) हा हातात आयताकृती कोयत्यासारखे शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त केले. या प्रकरणी आरोपी आकाश रामटेके याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Popular Articles