spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवरात्रोत्सवापूर्वी केळापूरचा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे आश्वासन

पांढरकवडा :- आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री जगदंबा देवस्थान केळापूर येथे होणाऱ्या यात्रा उत्सवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (२५) रोजी पांढरकवडा पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी श्री जगदंबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, पोलीस निरीक्षक एल.डी तावरे एनएचआयएचे अधिकारी आलोक श्रीवास्तव तसेच पत्रकार उपस्थित होते.

नवरात्रोत्सव काळात केळापूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्था व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सुरू असलेले काम उत्सवापूर्वी पूर्ण करण्याबाबत एनएचआयएच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

यावेळी एनएचआयएचे अधिकारी आलोक श्रीवास्तव यांनी उड्डाणपुलाचे काम ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात केळापूर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

बैठकीदरम्यान यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि इतर आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. ही बैठक पांढरकवडा पोलिस स्टेशनमध्ये पार पडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.