– तीन दिवसापासून बेला पोस्टात ठणठणाट
बेला :- गेल्या तीन दिवसांपासून बेला शाखा डाकघरात लिफाफे व त्यावर लावायच्या पाच,दहा रुपयाच्या तिकीट मिळत नाही.त्यामुळे रक्षाबंधनाच्या राख्या कशा पाठवायच्या ? असा पेच बहिणींना पडला असून रक्षाबंधनाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बोरी येथील उपडाकघरातही तिकिटांचा ठणठणाट आहे. मागणी केल्यानंतरही अध्याप तिकीट,लिफाफे मिळाल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
लिफापे मिळाले नाही, तर खाजगी दुकानातून कोरे लिफापे मिळू शकतात.मात्र,तिकिटाशिवाय राख्या पाठवता येत नाही.परिणामी,५५ रुपये खर्च करून स्पीड अथवा रजिस्टर पोस्टाने राख्या पाठवण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रेवेन्यू तिकीटचा नेहमी तुटवडा
येथील शाखा डाकघरात एक व पाच रुपयाच्या रेवेन्यू तिकीट नेहमी मिळत नाही.अशी ग्राहकांची ओरड आहे. रेवेन्यू तिकीट मिळत नसल्यामुळे व्यवहारिक कामकाजावर परिणाम पडतो.तसेच तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना बुटीबोरी उमरेड किंवा बाहेरगावी जावे लागते.
प्रतिक्रिया – बेला मोठे गाव आहे. येथे उपडाकघर होणे गरजेचे आहे. मात्र,त्याकडे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.काम जास्त व मनुष्यबळ कमी.अशी येथील केविलवाणी अवस्था आहे. रक्षाबंधनाच्या राख्या पाठवण्यासाठी डाकघरात गेलो असतो मला तिकीट मिळाल्या नाही.
यादवराव भनारकर माजी ग्राम पंचायत सदस्य





