यवतमाळ एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल

0
20

– पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बसचे लोकार्पण

यवतमाळ :- यवतमाळ एसटी महामंडळ आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या असून पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते फित कापून या बसचे लोकार्पण आज शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी त्यांनी या नवीन बसेसची पाहणी करुन सुविधांची माहिती घेतली.

या लोकार्पण कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता जयेश पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे, आगार व्यवस्थापक पराग भोपळे, सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र वानखेडे, वाहतूक निरीक्षक उत्कर्ष मोहाडे, हरिश थोरात यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.