spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुंबई-दुबई विमान प्रवासात २५ लाख लंपास

मुंबई :- मुंबईहून दुबईला प्रवास करणाऱ्या एका ४६ वर्षीय महिलेच्या बॅगेतून तब्बल २५ हजार अमेरिकन डॉलर (२५ लाख रुपये) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पाइसजेटच्या विमानात घडलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने सोबत प्रवास करणाऱ्या आपल्याच मैत्रिणीवर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

चेकिंग दरम्यान मैत्रिणीकडे दिली होती बॅग, २५ लाख गायब

चोरीची ही घटना २६ ऑगस्ट रोजी मुंबई-दुबई स्पाइसजेट विमानातील प्रवासादरम्यान घडली. पीडित महिला आणि तिची मैत्रीण एकत्र प्रवास करत होत्या. मुंबई विमानतळावर सुरक्षा चेकिंग आणि तपासणी प्रक्रियेदरम्यान पीडित महिलेने आपली पैशांची बॅग काही वेळेसाठी मैत्रिणीच्या ताब्यात दिली होती. या बॅगेमध्ये १०० डॉलरच्या २५० नोटा (एकूण २५,००० डॉलर) ठेवण्यात आल्या होत्या. यातील १२,५०० डॉलर हे महिलेचे स्वतःचे होते, तर उर्वरित १२,५०० डॉलर तिच्या मैत्रिणीचे होते. विमान दुबईत पोहोचल्यानंतर पीडित महिलेने आपली बॅग पाहिली असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. बॅगेचा लॉक तुटलेल्या अवस्थेत होता. संशय आल्याने महिलेने तात्काळ बॅग उघडून पाहिली असता त्यातील सर्व २५ हजार अमेरिकन डॉलर गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान बॅग मैत्रिणीकडेच होती आणि प्रवासादरम्यान तिचीच बॅगेवर नजर होती, त्यामुळे पीडित महिलेने आपल्या मैत्रिणीवरच चोरीचा थेट संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एनसीआरबी अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. गायब झालेल्या २५ लाख रूपयांच्या परदेशी चलनाचा शोध आता पोलीस घेत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.