– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतून ₹२५.८५ लाखांची सुविधा; नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन
कामठी :- प्रबुद्ध नगर येथील आम्रपाली बुद्ध विहार परिसरातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी ज्ञान व सामाजिक उपक्रमांना चालना देणाऱ्या ई-लायब्ररी व समाज भवनाचे लोकार्पण रविवारी कामठी नगरपरिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून प्राप्त ₹२५ लाख ८५ हजारांच्या निधीतून या सुविधेची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी, ई-लायब्ररी ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे तसेच युवकांसाठी ज्ञानवृद्धीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. समाज भवनाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सामुदायिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, परिसराच्या सामाजिक विकासाला यामुळे नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कामठी शहर भाजप अध्यक्ष मंगेश यादव, राजेश खंडेलवाल, माजी नगरसेवक कपिल गायधने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोंडुलवार, समिती अध्यक्ष कुणाल गोस्वामी, आशु अवस्थी, अथर्व पिंगले, सुनील पमनानी, गोपाल सिरिया, कमलेश शर्मा, कृष्णा खंडेलवाल, निशांत यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





