spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हद्दपार आदेश धुडकावून कामठीत धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालनारा बादल संतापे पोलिसांच्या ताब्यात

कामठी :- नागपूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला बादल संतापे वय २७ वर्षे रा रमानगर याने हद्दपार आदेश झुगारून कामठीत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. अब्दुलशहा दर्गा परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरत नागरिकांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या नोंदीनुसार बादल संतापे याच्याविरुद्ध नागपूर शहर पोलिसांनी ३० मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अंतर्गत दोन वर्षांसाठी नागपूर जिल्ह्यातून भंडारा येथे हद्दपार केले होते. हद्दपार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असतानाही त्याने कोणतीही परवानगी न घेता कामठीत प्रवेश केले.

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९.१० वाजेदरम्यान अब्दुलाशहा दर्गा परिसरात बादल संतापे धारदार शस्त्रासह आढळून आला. यावेळी त्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना शिवीगाळ करून धमकावल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरनी पोलिसानी ताब्यात घेतलेल्या हद्दपार बादल संतापे विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच शस्त्र कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.