spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आयुष्यमान हॉस्पिटलविरोधात चौकशीची मागणी,दोषी आढळल्यास FIR दाखल करण्याची शिवसेनेची मागणी 

– पीडित कुटुंबाला योग्य मोबदला व न्याय मिळवून देण्याची मागणी

नागपूर :- आयुष्यमान हॉस्पिटल, पंचशील टॉकीजसमोर, बिग बाजारच्या मागे, नागपूर येथे उपचारादरम्यान विठ्ठल तुकाराम साठे यांचा मृत्यू झाल्याच्या घटने प्रकरणी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी ६ सप्टेंबर रोजी, आयुष्यमान हॉस्पिटलसमोर विठ्ठल तुकाराम साठे यांचा मृतदेह ठेवून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच कुटुंबाला योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलना दरम्यान रुग्णालयाच्या कारभारा बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. शिवसेने च्यावतीने हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. मुरली तसेच डॉ. रूबी यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशीत संबंधितांकडून कोणतीही वैद्यकीय अथवा कायदेशीर अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार FIR दाखल करून आवश्यक ती पुढील कारवाई करावी तसेच हॉस्पिटलच्या कामकाजा बाबत बार कौन्सिलकडे निवेदन देण्यात येणार आहे, रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची व संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्यास संबंधित रुग्णालयाच्या परवानग्या, नोंदणी व इतर वैधानिक बाबींचीही सक्षम प्राधिकरणा मार्फत तपासणी करण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेने व्यक्त केली. दरम्यान, मृत विठ्ठल तुकाराम साठे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची पद्धत, वैद्यकीय नोंदी, उपचारा दरम्यान घेण्यात आलेले निर्णय आणि संबंधित रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या उपचारांची प्रक्रिया यांची सक्षम यंत्रणे मार्फत तपासणी करण्यात यावी.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला पूर्वग्रहाने दोषी ठरविण्याचा प्रश्न नसून, निष्पक्ष चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, हीच मागणी आयुष्यमान हॉस्पिटल विरोधात युवा सेना जिल्हा प्रमुख शरद सरोदे यांच्या नेतुत्वत आयुष्मान हॉस्पिटल पंचचिल चौक, बर्डी येथील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांनी यावेळी व्यक्त केली. या आंदोलनात महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मनीषा पपडकर, सुषमा इंगळे, मनीषा पराड, मुलासिंग गौर, पंकज खिच्ची, प्रतीक बहुगुणा, नैना दीक्षित, विक्रम ठाकूर, स्वप्निल वेश्य, उपशहरप्रमुख व शहर समन्वयक सोहम पापडकर, सागर बावने, महेश पारधी, अजय मोहाडीकर, तसेच अमित बजाज, विनोद प्रजापती, हरीश शाहू, मनीष दिनकर, पोलीस पाटील भूजल कालपूर, महेश ढोले, यश डोंगरे, शुभम साठे, मृतकाचे पुत्र सतीश दिनकर, आजनडोहचे सरपंच अनिल दिग्रस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.