spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडहिंग्लज, कागल नगरपरिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी नियोजन विभागाने ३६८ कोटीच्या निधीची तरतूद करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई :- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गडहिंग्लज व कागल नगरपरिषदांच्या हद्दीत वापरलेल्या पाण्याच्या (सांडपाणी) प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधीची तरतूद नगरविकास विभागाने करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. गडहिंग्लज नगरपरिषदेसाठी १९० कोटी रुपये, तर कागल नगरपरिषदेसाठी १७८ कोटी अशा ३६८ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मंत्रालयात गडहिंग्लज व कागल नगरपरिषदांच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शहरी भागातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून गडहिंग्लज व कागल नगरपरिषद क्षेत्रातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे, त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे तसेच स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

गडहिंग्लज व कागल नगरपरिषदांसाठी प्रस्तावित पाणी व्यवस्थापन प्रकल्पांना आवश्यक प्रशासकीय व आर्थिक बाबींची पूर्तता करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत नगरविकास विभागाने कार्यवाही करावी, या बैठकीत दोन्ही नगरपरिषदांमधील वापरलेल्या पाण्याचे संकलन, प्रक्रिया व योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस कागलचे माजी नगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रकाशराव गाडेकर, नगरसेवक प्रविण काळबर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, गडहिंग्लजचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, रामगोंडा पाटील ऊर्फ गुंडू पाटील, अमर मांगले, रश्मीराज देसाई आणि नरेंद्र भद्रापूर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.