spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिमेंटकरण सुरू असलेल्या रामटेक-चाचेर-मौदा रस्त्याची ग्रामपंचायत चाचेर तर्फे पाहणी

– एक महिन्यापासून बंद असलेले रस्ता दुतर्फा नालीचे अर्धवट बांधकाम तातडीने सुरू करण्याचे कंत्राटदार अभि इंटरप्राईजेस च्या अधिकाऱ्यांना निर्देश

किशोर साहू, मौदा :- चाचेर येथे सुरू असलेल्या प्रजिमा-23 (रा.मा.क्र. 331) रामटेक- चाचेर- मौदा या मुख्य रस्त्याच्या कामाची ग्रामपंचायत चाचेर तर्फे सोमवार (ता. 7 सप्टेंबर) ला प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

सदर काम अभी एंटरप्राईजेसच्या माध्यमातून सुरू असून, चाचेर हे 7 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून मुख्य रस्ता गावाच्या मध्यातून जातो. पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्यासाठी दोन्ही बाजूला नालीचे काम हाती घेण्यात आले आहे.

परंतु प्रत्यक्ष पाहणीत गंभीर बाबी निदर्शनास आल्या  काम गेल्या 1 महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे, अर्धवट खोदलेल्या ड्रेनेजमध्ये 8 ते 10 फूट पाणी साचून आहे,  यामुळे आजूबाजूच्या दुकानदार, व्यावसायिक आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.पाणी साचलेल्या खड्ड्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज संबंधित एजन्सीचे अधिकारी सोलंकी व त्रिपाठीजी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून तात्काळ नाली बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी सरपंच लुंबिनी महेश कलारे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, प्रकाश वाकलपुडी, सुरेंद्र टेम्भरे, योगेश निनावे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, ममता चौरे तसेच विनोद कोपरकर, बाळाभाऊ खंडाईत, नरेश बादोले, पापा शेख, महेश महादुले, शाकीर शेख, महेश सोनवणे, प्रकाश गुंडम, गज्जू दोडके, मल्लू गडे, विठूजी बरबटे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उल्लेखनीय बाब 

दिनांक 27/06/2026 रोजीच ग्रामपंचायत चाचेरने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्र देऊन चाचेर गावाच्या हद्दीत सर्विस रोड, ब्रेकर, गट्टू, मदन बरबटे यांच्या कॉम्प्लेक्सजवळ पूल बांधकाम, सी.डी. वर्क व हाईमास्ट लाईट (12 मी.) बसविण्याची अधिकृत मागणी केली होती. त्याचाच पाठपुरावा सदर पाहणी करण्यात आली,हे विशेष!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.