spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

M’s Academy & Beauty Place तर्फे ग्रँड मेहंदी कॉम्पिटिशन सीझन-2 उत्साहात संपन्न

नागपूर :- टी एम ॲकडमी ॲन्ड ब्युटी प्लेस तर्फे आयोजित ग्रँड मेहंदी कॉम्पीटेशन सीजन -2 ही मेहंदी कलेला प्रोत्साहन देणारी स्पर्धा नुकतीच उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या स्पर्धेला मेहंदी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध प्रकारच्या आकर्षक, कलात्मक आणि नाविन्यपूर्ण मेहंदी डिझाइन्स साकारत सहभागी स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. मेहंदी कलेमध्ये असलेली सर्जनशीलता, कल्पकता, बारकावे आणि कलात्मक दृष्टिकोन यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धे दरम्यान सहभागी कलाकारांनी पारंपरिक तसेच आधुनिक शैलीतील विविध मेहंदी डिझाइन्स साकारून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या कल्पनाशक्तीचा प्रभावी वापर करत आकर्षक कलाकृती सादर केल्या. या स्पर्धेचे आयोजन तेजश्री उपाध्याय यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मीनू गुप्ता यांनी केले. त्यांनी स्पर्धकांच्या कलाकृतींचे बारकाईने परीक्षण करून त्यातील रचना, सफाई, सर्जनशीलता, डिझाइनची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि कलात्मकता या विविध बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली. याप्रसंगी कार्यक्रमाला मुख्य अतिथी आरती टेंभुर्णे यांची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृती आणि प्रभावी सादरीकरणाच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये — विजेती :खुशबू पठाण, प्रथम उपविजेती : अरहमा परवीन, द्वितीय उपविजेती :खुशाली यादव, विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचेही त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले. स्पर्धेमुळे नवोदित तसेच अनुभवी मेहंदी कलाकारांना आपली कला आणि कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. या उपक्रमाच्या माध्यमातून मेहंदी कलेला व्यावसायिक आणि कलात्मक व्यासपीठ मिळावे, कलाकारांमध्ये सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि त्यांच्या कौशल्याला योग्य प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी सहभागी कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस टी एम अकॅडमी अँड ब्युटी प्लेस च्यावतीने सर्व सहभागी स्पर्धक, विजेते, परीक्षण मीनू गुप्ता, मुख्य अतिथी आरती टेभुर्णे तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.