नागपूर :- आधुनिक जीवनशैलीच्या काळात मुलांना स्तोत्र पठणाची सवय लागावी, त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध व्हावेत आणि गणेशोत्सवाच्या पावन पर्वात श्री गणेश भक्तीचा जागर व्हावा, या उद्देशाने श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन च्या द्वारे ५ ते १० वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धा ५ ते १० वर्षे वयोगटातील विद्यार्थी साठी आहे. स्तोत्राचे पठण करताना स्पष्ट व शुद्ध उच्चार, लय व चाल हे स्पर्धेचे प्रमुख निकष असतील.
प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप दिनांक १४ ते १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत खालील 9766573802 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावी. व्हिडिओच्या सुरुवातीला विद्यार्थ्याने आपले संपूर्ण नाव, शाळेचे नाव व पूर्ण वय स्पष्टपणे सांगून त्यानंतर अथर्वशीर्षाचे पठण रेकॉर्ड करावे. फलश्रुती म्हणू नये. व्हिडिओ क्लिपमध्ये कोणतेही पार्श्वसंगीत वापरू नये. स्पर्धेचा निकाल : १९ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येईल. नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेत एकूण ११ रोख पुरस्कार व गौरवचिन्ह सहित प्रदान करण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गौरवपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न होईल. ज्या विद्यार्थी गणेशभक्तांना सहभाग घ्यायचा त्यांनी स्पर्धेचे संयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे यांचेशी संपर्क साधावा.





