spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान शहर विकास मंच द्वारे वृक्षारोपण करण्यात आले

कन्हान ११ : – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधुन कन्हान शहर विकास मंच द्वारे कन्हान, कांद्री परिसरात वृक्ष रोपण करण्यात आले .
संताजी नगर क्रांद्री येथे मंच चे नवनिर्वाचित सदस्य सतीश बेलसरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महामानव क्रांतीसुर्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करुन  कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र्यावर व माजी नगरसेविका राखी परते यांनी जागतिक आदिवासी दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा आवार संताजी नगर कांद्री, हनुमान नगर समाज भवन, कन्हान पोलीस स्टेशन परिसर, प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे विविध प्रकारचे E वृक्षाचे रोपण करण्यात आले. मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे डॉ.लआयुषी डंभारे, माजी नगरसेविका राखी परते, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, साहिल सैय्यद, धीरज सोलंकी, नाना ऊकेकर, शुभम बावनकर, सतिश बेलसरे, अभिषेक साखरे, निखिल मेश्राम, आयुष संतापे, प्रल्हाद कुंभरे, राजु उमाळे, निशा उके, अभय उके, रुजलं मेश्राम सह मंच कार्यकर्ते आणि बहु संख्येने नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते

Popular Articles