spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूरमध्ये दोन कुख्यात चोरांना अटक चार घरफोड्यांचा पर्दाफाश; तिसरा साथीदार फरार

नागपूर १२ : मानकापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दोन कुख्यात चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून चार घरफोड्यांचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. मात्र या गुन्ह्यांतील त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अस्लम काझी आणि करण पाटील अशी असून, त्यांनी झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत नगरमधील एका घरातून स्पोर्ट्स बाईक तसेच सोनं-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता अस्लम काझीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने करण पाटीलसह यशोधरा नगर आणि कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील चोरी केल्याचे उघड केले. पोलिसांनी आरोपींकडून एकूण सुमारे ३.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चोरलेली स्पोर्ट्स बाईक आणि दागिन्यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी चोरीचा काही मुद्देमाल एका सोनार मित्राकडे दिल्याचे उघड झाले असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

Popular Articles