spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कालव्यात बुडालेला १८ वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता किरणपूर येथील घटना; शोधकार्य सुरू

नागपूर १२ : नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणपूर गावात १८ वर्षीय तरुण कालव्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, २४ तास उलटूनही तरुणाचा मृतदेह सापडलेला नाही. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी शोधकार्य करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक वासुदेव गजाम (वय १८, रा. किरणपूर) हा त्याच्या मित्रासोबत कालव्यात आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान, त्याचा मित्र नाश्ता आणण्यासाठी काही वेळासाठी तिथून गेला. परत आल्यावर ऋतिकचे कपडे किनाऱ्यावर दिसले, मात्र तो स्वतः गायब होता. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस व स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली आहे. अद्याप मृतदेह न सापडल्याने कुटुंबीय व गावकरी चिंतेत आहेत.

Popular Articles