विद्युत सुरक्षा सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
5

कन्हान :- महावितरण उपकार्यकारी अभियंता उप विभाग कन्हान च्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताहांतर्गत ग्रामीण भागातील यशवंत विद्यालय, वराडा येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर तसेच स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास महावितरणचे उपकार्यकारी अभि यंता मा. किशोर निंबाळकर, कनिष्ठ अभियंता निलम तोहगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घरात वीज वापरताना योग्य रोधकाचा वापर करणे, विद्युत उपकरणांची जोडणी व्यवस्थित ठेवणे, तसेच विद्युत जोडणीमध्ये न्यूट्रलसाठी निळी, फेजसाठी लाल आणि अर्थिंगसाठी हिरवी वायर असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विद्युत प्रवाहाचा धक्का किंवा कोण तीही दुर्घटना घडल्यास सर्वप्रथम मेन स्विच बंद करावा , त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता येते. पाणी हे विद्युत वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा वापर विशेष काळजीपूर्वक करावा. तसेच विद्युत उप करणांवर आयएसआय मार्क असलेलीच उत्पादने वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्या र्थ्यांना विविध विद्युत सुरक्षा उपायांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. बी. निंबाळकर, शिक्षक आर. बी. गभणे, आर. व्ही. गणवीर, एस. पी. कुथे, शिक्षिका ए. आर. शिंगणे, कु. पी. एम. कोटरूंघे, शिक्षकेतर कर्म चारी एम. व्ही. रहाटे, डी. एम. पांडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.