– इमामवाडा पोलिसांच्या तपासाची निष्पक्ष चौकशी करण्याची समाजसेविका मीना अडकने यांची मागणी
नागपूर :- रामबाग परिसरातील रहिवासी पीडित महिला मीरा नामदेव काळबांडे यांनी आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पत्रकार परिषद घेऊन इमामवाडा पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले. (FIR No – प्रथम खबर क्र. 0425 -23/09/ 2026
याप्रकरणी २३ सप्टेंबर २०२६ रोजी, इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मीरा काळबांडे यांच्या तक्रारीनुसार, प्रकरणातील त्यांचे संपूर्ण जबाब अद्याप नोंदविण्यात आलेले नाहीत. तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले नसून, इलेक्ट्रॉनिक तसेच भौतिक पुरावे संकलित करण्याची कार्यवाहीही योग्य पद्धतीने झालेली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, तसेच सर्व संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवून उपलब्ध पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी समाजसेविका मीना अडकने यांनी केली. पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तपासाची निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला पीडित महिला मीरा काळबांडे यांच्यासह रामबाग परिसरातील सुमारे २५ ते ३० महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी पीडितेला न्याय मिळण्याची मागणी केली. या प्रकरणासंदर्भात संपर्क : समाजसेविका मीना अडकने – ९९६०६ २७३३०


