सावनेर १२ : भालेराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) मार्फत “तुळशी रोप दान” हा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या शतकी महोत्सवानिमित्त सामाजिक हिताचे कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.
सामाजिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनात तुळशीचे महत्त्व सर्वपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. या निमित्ताने रा. से. यो. स्वयंसेवक आणि हायस्कूल विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी व प्रभातफेरी काढली. शहरातील विविध सामाजिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन तुळशीची रोपे वाटप करण्यात आली.
या प्रसंगी रा. से. यो. समन्वयक प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी तुळशी दानाचे सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. उपक्रमाला हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष ऍड. जयंतराव खेडकर, उपाध्यक्ष दिलीप बुट, सचिव विजयसिंग सावजी, प्राचार्य डॉ. पराग निमिषे, प्रा. डॉ. सुनील डोंगरे, प्रा. डॉ. विलास डोईफोडे, प्रा. रवींद्र भाके, विलास सुहागपुरे, वसुंधरा करडमारे, हर्षला ढेपले, त्रिवेणी पाटील, उत्कर्षा चौधरी, मुकुंद सेंबेकर, तरुण मेहंदोले, हर्ष नाचणकर, सेजल सूर्यवंशी, भाग्यलक्ष्मी तागडे, गीताश्री नवघरे, प्रगती भोयर आणि संपूर्ण रा. से. यो. पथक उपस्थित होते.








