spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये “वेस्ट टू वंडर” फॅशन शो

 

नागपूर, ता. १३ : केंद्र शासनाच्या “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नेहरुनगर झोन येथील भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये मंगळवारी(ता.१२) युवा दिनाचे औचित्य साधून ‘वेस्ट टू वंडर” या फॅशन शो आयोजित करण्यात आला.

यावेळी नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त  विकास रायबोले, शाळेतील शिक्षकवृंद मनपाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी, आयईसी चमूचे सदस्य आदी उपस्थित होते.

मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे युवा दिनानिमित्त आयोजित या फॅशन शो मध्ये विद्यार्थ्यांनी रॅम्पवर सुंदर सादीरकरण केले. ‘वेस्ट टू वंडर” या संकल्पनेतून पोशाख प्लास्टिकच्या पिशव्या, जुनी वर्तमानपत्रे, सीडी आणि इतर निरुपयोगी वस्तूंपासून अत्यंत कल्पकतेने तयार करण्यात आले होते. या फॅशन शो च्या माध्यमातून  कचऱ्याला कलेच्या दृष्टीकोनातून पाहण्यात यावे असा संदेश देण्यात आला. यावेळी “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” या अभियानाला विशेष महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व, राष्ट्रीय एकता आणि स्वच्छतेची जबाबदारी बाबत आपले महत्वपूर्ण विचार मांडले.

Popular Articles