spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘पौर्णिमा दिनानिमित्त व्हीएनआयटी, अभ्यंकर नगरमध्ये जनजागृती

 

नागपूर, ता. १३  :  नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या संयुक्त वतीने सोमवारी (ता.११) ‘पौर्णिमा दिनानिमित्त व्हीएनयआयटी, अभ्यंकर नगर येथे जनजागृती करण्यात आली.

 माजी आमदार तथा माजी महापौर  प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला व्यापारी आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला. यावेळी स्वच्छ भारत नागपूरचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे  कौस्तुभ चॅटर्जी,  मेहुल कोसुरकर,  विष्णुदेव यादव,  प्रिया यादव,  श्रीया जोगे, पिनाकी बानिक,   प्रतीक इसमपल्लीवार यांनी या अभियानात सहभाग नोंदविला.

फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना एक तास विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला ओंकारनगर चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले

Popular Articles