नागपूर १३ : राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर तर्फे श्री संत रविदास सांस्कृतिक सभागृहात दहावी आणि बारावी इयत्ता उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजीमंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर चे युनीट समाज संघटनेचे कार्य उत्तम रितीने करित आहे. सामाजिक कार्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास मी सदैव संघटनेच्या पाठीशी आहे अशी ग्वाही खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिली. शिक्षित विद्यार्थी शिक्षित समाज घडवू शकतात म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम आवश्यक आहे असे आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य यांनी सांगितले. समाज संघटन योग्यरित्या झालं तर समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होते असे मत व्यक्त करताना नागपूर कार्यकारणी महाराष्ट्रात एक नंबर वर आहे असे समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी प्रशंसा केली. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आर टी बिल्डर्सचे इंजिनियर रमेश तांबटकर, रवी कमर्शियल बँकेचे अध्यक्ष महेंद्र भागवतकर, नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष श्रीरामजी मांडस्कर गुरुजी, सहायक पोलीस निरीक्षक पंकज ज्ञानेश्वर काकडे, हिंगोली महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा गायकवाड, यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बसेशंकर, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी मीना भागवतकर, राज्य कार्यकारणी सदस्य पंढरीनाथ तांबटकर, संत रविदास छात्रालयाच्या उपाध्यक्ष सरोज काटवले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.१० वी चे प्रथम बक्षिस अभिनव प्रिती सतिश कंखे, यांना आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते देण्यात आले. १२ वी चे प्रथम बक्षिस यश रिया शाम कनोजे यांना माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते देण्यात आले. १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, संविधान ग्रंथ, सन्मानपत्र, रोख आणि गुलाबपुष्प देऊन अतिथी आणि दानदात्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव सोनेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक प्रदेश सचिव लीलाधर कानोडे यानी केले तर संचालन ज्ञानेश्वर काकडे यांनी तर महिला आघाडी कार्याध्यक्ष रेखा काटोले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिल काटोले, संपर्कप्रमुख महादेव बिंजाडे, सचिव ज्ञानेश्वर काकडे, सहसचिव रुपेंद्र बसेशंकर कोषाध्यक्ष प्रभाकर राजूरकर, सहसचिव विठ्ठल चरडे, उपाध्यक्ष लक्ष्मण सातनुरकर, उपाध्यक्ष अनिल पोरटकर, अँड. राजकुमार शेंडे, आशिष ठोंबरे, गोपीचंद गवळे, महेंद्र मालखेडे, राजेश सोपानकर, राजकुमार डहाके, बालू बनसोड, नारायण मालखेडे, राजेंद्र इंगोले, शेषराव काटोले, सुनील खोब्रागडे, महेंद्र खरोले, चंद्रकला कानोडे, लीना बावणे, अर्चना मेंढे, गायत्री बांडाणे, गिता इल्लुरकर, मीरा गजूरकर, प्रभा बसेशंकर आदींनी परिश्रम घेतले. समाजाच्या विद्यार्थ्यांचा समाजातर्फे झालेल्या या सत्कार समारंभाला समाज बांधवांतर्फे भरघोस सहकार्य मिळाले. लक्ष्मणराव देऊळकर, देवाजी कुरील, गणेश बोडखे, गोसावी खोले, प्राध्यापक विलास घोडे, विनोद सातपुते, नरेंद्र काटोले, भोजराज बसेशंकर, प्रा. प्रल्हाद वानस्कर, अशोक इल्लुरकर, महादेव तांबेकर, डॉ. शिरीष चापेकर, अँड. मधुकर इल्लुरकर, अशोकराव इंगळे, विजय चंदनकर, गोपाल बोडखे, सुरेश मालखेडे, किशोर मोकडे, डॉ. शिवाजी पदमने, विरेंद्र काटोले, रामकृष्णाजी मांगे, मनोहर देऊळकर, प्रा. वैशाली भुजबळ, अनील शिवणकर, सुनील येटरे, सुरेश काकडे, इ. समाज बांधवांचे मोठे सहकार्य लाभले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने समाज बंधूभगिनी उपस्थित होत्या. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सदैव पाठीशी उभा राहणार- खासदार श्यामकुमार बर्वे








