– १९ ऑक्टोबरला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा
नागपूर :- धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने १९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे.
मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे (नाशिक) यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई तानसेन नन्नवरे (मुंबई), सैय्यद रालिम बापू (मराठवाडा), डॉ. सुधा जनबंधू (विदर्भ), सुनीता दाभाडे (खान्देश), दशरथ कांबळे (पश्चिम महाराष्ट्र) आणि उत्तमराव गायकवाड (कोकण) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रमेश दुपारे आणि वैशाली तभाने यांची भूमिका राहणार आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती, रिपब्लिकन पक्षाची सद्यस्थिती व वाटचाल, प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांची भूमिका आणि सत्तेसोबतचे संबंध यावर चर्चा होणार आहे. तसेच महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरही गहन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासह रिपब्लिकन चळवळीसमोरील आव्हानांवर चर्चा केली जाणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पत्रपरिषदेला नामदेवराव निकोसे, देवेंद्र बागडे, प्रा. रमेश दुपारे, प्रवीण आवळे, प्रकाश कांबळे, राजूदादा पांजरे, डॉ. सुधा जनबंधू, वैशाली तभाने, पुण्यशील बोदिले, घेमाजी बागडे, अतुल गंगापूरकर आणि नरेश खन्ना उपस्थित होते.








