spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

मारेगाव, वणी :- जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले मार्गदर्शन यवतमाळ, दि. 6 (जिमाका) : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६, नियम, २००८ तसेच सुधारित नियम, २०१२ यांच्या अंतर्गत सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा मारेगाव येथे पार पडली.

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय, मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, मारेगाव येथे झालेल्या या कार्यशाळेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सामूहिक वनहक्कांचे संवर्धन, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्रामसमुदायांना प्राप्त वनहक्कांचा योग्य पद्धतीने वापर व व्यवस्थापन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

कार्यशाळेत वनहक्क कायद्यातील तरतुदी, सामूहिक वनहक्कांची प्रक्रिया, वनसंपत्तीचे संवर्धन आणि ग्रामसमुदायाची भूमिका याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा व तालुकास्तरीय कन्ह्वर्जन्स समिती, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले.

वणी येथे वन हक्क कार्यशाळेला उपस्थिती

मारेगाव येथील कार्यशाळा पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी वणी येथील लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित वन हक्क कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार उपस्थित होते.

Popular Articles