spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दान दात्यांनी रक्तदान करावे !

नागपूर शहरात सव्वा लाख पिशव्यांची अत्यंत गरज आहे मोरया फाऊंडेशन चा उपक्रम – रजनी चव्हाण
नागपूर १३ : रक्त दान करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे, ज्यामुळे समाजात रक्ताची उपलब्धता वाढते आणि गरजू व्यक्तीना वेळेवर मदत मिळू शकते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेठी मधील साठा कमी पडू लागला आहे, हीच गरज लक्षात घेऊन मोरया फाउंडेशन ड्रीम फॉर लाइफ फाउंडेशन द स्टेंग्थ ऑफ युनिटी फाउंडेशन या संस्था तर्फे स्व.जोसेफ जॉर्ज यांच्या स्मृती प्रित्यर्थ १० ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत हे रक्तदान शिबिर सुपर स्पेशालिटी रुग्णालय रक्तपेठी, नागपूर यांच्या सहयोगाने आयुर्वेदिक ले आउट येथे आयोजित केले होते. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंगू इत्यादी रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते, सध्या नागपूर शहराला सव्वा लाख रक्त पिशव्यांची गरज आहे. परंतु त्या मानाने ८० ते ८५ टक्के रक्त च उपलब्ध होते. यासाठी शहरातील जास्तीत जास्त दान दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक सौ. रजनी अविनाश चौहान, रोशन अरसपुरे, कुणाल मौर्य यांनी केले. शिबिरात यावेळी रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचे अचम्मा जोसेफ यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अपूर्वा बावनगडे, अंकित बनसोड, एलेन बोरकर, अभिषेक उरकुडे, सौरभ, आदित्य थडानी इत्यादी चे महत्वपूर्ण योगदान लाभले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.