spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवघ्या २० रुपयांसाठी १३ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले जीवन 

🔸समाजमन सुन्न करणारी घटना! २० रुपयांपेक्षा मुलाचे आयुष्य स्वस्त झाले का? 

सचिन चौरसिया, रामटेक :- सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेला अवघ्या १३ वर्षांचा मुलगा पुन्हा कधीच घरी परतणार नाही, याची पुसटशी कल्पनाही त्याच्या आई-वडिलांना नव्हती. शाळेत जाताना अवघे २० रुपयासाठी आईने नकार दिल्याने काहीही न बोलता घराबाहेर पडलेल्या आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली. नैतिक संजय दशमेर (१३ वय ) रा. पथरई असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नैतिक हा पथरई (अंबाझरी) येथील नवजीवन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नैतिक नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाला. आईकडे २० रुपयांची मागणी केली. आईने पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा केलाच्या उल्लेख तक्रारीत असल्याची माहिती आहे. त्यानंतर नैतिक काही न बोलता घरातून निघून गेला. काही वेळानंतर गावातील प्रकाश सोनटक्के यांनी नैतिकनी विश्वनाथ वासनिक यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती त्याच्या आईला दिली. ही माहिती मिळताच आईसह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाला २० रुपये न दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहे.

आज नैतिक गेला… उद्या आणखी एखादे बालपण हरवू नये!

मुलांना महागडी खेळणी, मोबाईल किंवा मोठ्या सुखसोयी देण्यापेक्षा त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. मुलांचा हट्ट, राग किंवा अबोला यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना नकार पचविण्याचे बळ आणि अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास देणे ही पालकांसह शिक्षक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. एका निष्पाप जीवाच्या जाण्यानंतर तरी आपण मुलांचे मन समजून घेणार आहोत का? हा प्रश्न आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवा.

Popular Articles