कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेख बुनकर कॉलनी परिसरात एका घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेली तब्बल आठ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना गत्ररात्री निदर्शनास आली. ही घटना नूर मोहम्मद फाजलानी (वय ३३) यांच्या राहत्या घरात घडली.यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घरातील कपाटाच्या तिजोरीत आठ लाख रुपये रोख ठेवले होते. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कपाट उघडून पाहिले असता रक्कम मिळून आली नाही .
या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(अ) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.








