कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नगर काँग्रेस कमिटी, कामठीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले, तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा मूलमंत्र दिला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मानवता, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे.असे मौलिक मत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी मौलिक वक्तव्य करीत महामानवांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला कामठी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव, कामठी नगर परिषद विरोधी पक्षनेते काशिनाथ प्रधान, माजी सरपंच सरिता रंगारी, माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, माजी नगरसेवक नीरज लोणारे, इरशाद शेख, मीर आरिफ अली, वरिष्ठ नगरसेवक अहफाज अहमद, मोहम्मद शारीक अंसारी, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेविका सातिका खांडेकर, प्रतिमा गजभिये, योगिता खोब्रागडे, कल्याणी रामटेके, माजी नगरसेविका ममता कांबळे, राजेश कांबळे, निलेश मेश्राम, अलंकार गजभिये, दिनू नागदेवे, वसिफ अन्सारी, मोहतशीम अंसारी, शिल्पा शंभरकर, हिराबाई चवरे, सिंधु मेश्राम, सुमन डंभारे, विजया गजभिये, सत्यफुला खोब्रागडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








