spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांनी आपले संपूर्ण जीवन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी खर्ची घातले – माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर 

– कर्मवीर दादासाहेब कुंभारे स्मूर्तिदिनानिमित्त अभिवादन

कामठी :- बिडी कामगारांचे हृदय सम्राट व माजी सांसद सदस्य कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांनी आपले संपूर्ण जिवन परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी त्यांनी खर्ची घातले,या चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या हातातून घेतलेली मशाल तेवत ठेवली पाहिजे असे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आज 14 ऑक्टोबर ला कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तीदिनानिमित्त अभिवादन प्रसंगी व्यक्त केले..

कर्मवीर ऍड नारायण हरी कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा जन्म बिडी उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या कामठी शहरात 23 मार्च 1923 रोजी झाला.तर 14 ऑक्टोबर 1982ला ऍड दादासाहेब कुंभारे यांचे दुःखद निधन झाले.तेव्हा आज 14 ऑक्टोबर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसरात स्थित ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पास माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी माल्यार्पण करून सामूहिक मानवंदना वाहली.

याप्रसंगी कामठी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव, कामठी नगर परिषद विरोधी पक्षनेते काशिनाथ प्रधान, माजी सरपंच सरिता रंगारी, माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, माजी नगरसेवक नीरज लोणारे, इरशाद शेख, मीर आरिफ अली, वरिष्ठ नगरसेवक अहफाज अहमद, मोहम्मद शारीक अंसारी, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेविका सातिका खांडेकर, प्रतिमा गजभिये, योगिता खोब्रागडे, कल्याणी रामटेके, माजी नगरसेविका ममता कांबळे, राजेश कांबळे, निलेश मेश्राम, अलंकार गजभिये, दिनू नागदेवे, वसिफ अन्सारी, मोहतशीम अंसारी, शिल्पा शंभरकर, हिरा चवरे, सिंधु मेश्राम, सुमन डंभारे, विजया गजभिये, सत्यफुला खोब्रागडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles