– जयस्तंभ चौकात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण; ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
कामठी :- 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामठी येथील जयस्तंभ चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो’ अशा जयघोषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
१४ ऑक्टोबर हा भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन समता, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश दिला. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करीत भाजपच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
जयस्तंभ चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले. सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचे महत्त्व विषद करणाऱ्या या दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार टेकचंद सावरकर, नगराध्यक्ष अजय अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, भाजपचे कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव, नगरसेवक लालसिंग यादव, विवेक मंगतानी, चंद्रशेखर तुप्पट, दिलीप बांडेबुचे, कपिल गायधने, दिव्या गायधने, इशांत ठाकूर, राज हडोती, विजय कोंडुलवार, योगेश गायधने, अनिल पिंगळे, मुकेश वैद्य, प्रीतम यादव, नरेश पारवानी, गोपाल सिरिया, नरेश कलसे, प्रतीक पडोळे, आशु अवस्थी, जितेंद्र खोब्रागडे, कैलास मलिक, बबलू रोचलानी, कुंदा रोकडे, चंदा तुरस्कर, प्रेमलता शर्मा, बादल वरखेडे, राहुल मेश्राम आदी उपस्थित होते.







