चोरीतील १००% मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत
संजय कारवटकर, यवतमाळ १३ : वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरी येथील नागोबाचे मंदिरात लाकडी देवपाटावर ठेवलेल्या नागोबाच्या चांदी, तांबे आणि पितळाच्या धातूच्या छोट्या- छोट्या आकाराच्या एकूण २७ ते २८ मुर्त्या कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना दि ११ ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान घडली होती.
याप्रकरणी हरिहर विठ्ठलराव हरबडे रा. खैरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांनी परिसरात तपासचक्रे फिरवली व मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात दोन संशयित इसम आढळून आले.यावरून त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला व यातील आरोपी संजय अजाबराव कोकाटे वय ५५ वर्ष, रा. माता मंदिर वार्ड, हिंगणघाट व दीपक भीमराव शेंडे, वय ३७ वर्ष रा. नवीन वस्ती राळेगाव या दोन्ही आरोपीना दि ११ ऑगस्ट रोजी ५ वाजता वडकी येथून अटक केली व गुन्ह्यातील १००% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची कारवाई ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,बिट जमादार अमोल चौधरी निलेश वाढाई,दीपक वाड्रसवार, सचिन नेवारे,विनोद मोतेराव, आकाश कुदुसे,चालक अमीर किनाके यांनी केली आहे.








