कामठी १३ :- जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारीसपुरा येथे एका घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी नक्की अख्तर वर्ल्ड नियाज अहमद (वय 34) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून तब्बल 5,09,321 किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजल्यापासून 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत घडली. चोरट्याने दोन मजल्यावरील घरात शिरून कपाटातील सोन्याचे पेंडेंट, कानातील टॉप्स, मंगळसूत्र, हार, अंगठ्या, नाकातील तारा, चांदीची पायल तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
चोरी गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे वजन व किंमत मिळून एकूण 5,09,321 रु. आहे. याबाबत जुनी कामठी पोलिस ठाण्यात कलम 305(1), 331(3), 331(4) भा.दं.वि. नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी दाखल अधिकारी पो.उपनि. रमेश दुबाले यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना घराच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
@filephoto



