– दसऱ्याच्या पावन पर्वावर कार्यक्रमाचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती
हंसराज,भंडारा :- विश्व हिंदू परिषद, भंडारा नगरतर्फे विजयादशमी व दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्रपूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष अनील डोंगरवार, जिल्हा उपाध्यक्ष भरत मल्होत्रा, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी राव, तसेच सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष मयूर बिसेन प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास क्षत्रिय राजपूत समाजाचे बांधव, दुर्गा माता दौडचे कार्यकर्ते, महिला व पुरुष सदस्य, तसेच मातृशक्तीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








