spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मार्कंडादेव येथे रावण पूजा उत्साहात संपन्न

– छबिलदास सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; सुधाकर उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण

मार्कंडादेव :- मार्कंडादेव येथे रावण पूजा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छबिलदास नारायण सुरपाम होते, तर ध्वजारोहण सुधाकर मारोती उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी समाजातील विविध मान्यवर, महिला व पुरुष समाजबांधव सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रावण पूजा कार्यक्रम साजरा केला.

कार्यक्रमाला नीलकंठ काशिनाथ मरस्कोल्हे, थामदेव तुकडोजी आत्राम, शाम हनुमंत गेडाम, आनंदाराव परशुराम आत्राम, रितिक गजानन मरस्कोल्हे, पुष्पा नकुट कोडापे, माधुरी प्रभाकर परचाके, अलका खोंजेंद्र परचाके आणि बेबी सुधाकर उईके यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

Popular Articles