– कलश व अखंड ज्योतीचे विसर्जन
धामना :- अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता कन्याभोजनाने करण्यात आली. ११ ऑक्टोबर रोजी विधिवत पूजा-अर्चा करून कलशस्थापना करण्यात आली तसेच अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती.
नऊ दिवस चाललेल्या या नवरात्रोत्सवादरम्यान दररोज आरती, भजन, प्रवचन, देवी जागरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या समारोपानिमित्त कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन देण्यात आले. तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून कलश आणि अखंड ज्योतीचे विसर्जन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाची सांगता झाली.








