spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हर घर तिरंगा अंतर्गत मनपाचे विविध उपक्रम 14 ऑगस्ट रोजी बाईक रॅली 15 ऑगस्ट रोजी पालखी मिरवणुक

चंद्रपूर १४ – शासन निर्देशानुसार 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येत आहे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश असुन स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.

   यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतल्या जात असुन 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्रियदर्शिनी चौक येथुन बाईक रॅलीचे तसेच संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज जयंती निमीत्य 15 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजता गांधी चौक येथुन पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जंयती वर्ष आहे. येत्या ‘गोकुळ अष्टमी ‘ रोजी सांयकाळी 5 ते 7 या वेळेत संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मुर्तीची, पालखीतुन मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजता गांधी चौक येथुन पालखी मिरवणुकीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ते परत सावरकर चौक ते प्रियदर्शिनी चौक ते गांधी चौक असा रॅलीचा मार्ग असुन मनपा कार्यालय गांधी चौक असा मार्गक्रम असणाऱ्या बाईक रॅलीचे आयोजन 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.
शहरातील सर्व महाविद्यालये, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये यांना पत्र देऊन दोन्ही कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने विद्यार्थी,शासकीय कर्मचारी,राजकीय पक्ष,मनपा अधिकारी – कर्मचारी व इतरांचा प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. बाईक रॅली असल्याने हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.