कामठी ता प्र १४ :- देशाची आण बाण शान भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे.हे केवळ तीन रंग नसून शांतता, शौर्य आणि समृद्धतेचे प्रतीक आहे.शेकडो
वर्षाच्या गुलांगिरीवर मात करून स्वातंत्र्याच्या सुर्योदयाचा उदय आहे.भारताचे स्वातंत्र्य हुतात्म्यांच्या रक्तरंजित बलिदानाने प्राप्त झाले.लाखो वीरांच्या पराक्रमाने आणि विरगतीने स्वातंत्र्य प्राप्त
झाले. हे बहुमूल्य स्वातंत्र्य अबाधित राखणे,वीरांच्या शौर्याची गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या स्मरणात तेवत राखण्यासाठी, राष्ट्राभिमान जागविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वरभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ आज कामठीत 13 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या तिरंगा यात्रेची सुरुवात कामठी नगर परिषद कार्यालय येथून करीत शहरातील मोटर स्टँड चौक,हैदरी चौक, नेताजी चौक, आदी मुख्य मार्गाने भ्रमण करीत देशभक्तीचा जल्लोष करून जयस्तंभ चौक येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेचा समारोप करण्यात आला.याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान
तहसिलदार गणेश जगदाडे,नायब तहसीलदार मयूर चौधरी, नायब तहसीलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार उपेश अंबादे,मुख्याधिकारी विनोद जाधव, पंचायत समिती गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले,सहाययक गटविकास अधिकारी उके, तालुका कृषी अधिकारी,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोटे,वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यासह तालुका प्रशासनातील समस्त अधिकारी कर्मचारीगण सह नागरिक गण तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थीगण प्रामुख्याने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याधिकारी विनोद जाधव तर आभार तहसिलदार गणेश जगदाडे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता नगर परिषद प्रांगणात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली.
शाळा महाविद्यालय ,संघटनांचा सहभागनुकताच झालेला पाहलगाम हल्ला आणि पाकिस्तान विरोधी ऑपरेशन सिंदूर ची कारवाई यामुळे अवघ्या विश्वाला भारताची ताकद दिसली, शांतिप्रिय असलेला भारत प्रसंगी रुद्रावतार धारण करतो याचा परिचय अनेक देशांना आला.मनामनात राष्ट्राप्रती राष्ट्रभक्ती जागृत व्हावी या भावनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी संध्येला देशभरात देशभक्तीचा वातावरण निर्माण व्हावा म्हणून तिरंगा यात्रेचे आयोजन कामठी तहसील प्रशासनाच्या पुढाकाराने करण्यात आल्याचे मौलिक मत माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी व्यक्त केले.या तिरंगा यात्रेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षकगण तसेच शहरातील पुढारी ,आस्थापनांचे अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.




