किशोर साहू: मौदा, ता.१८ : दरवर्षीप्रमाणे यंदाही खात येथील प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात संस्थेचे अध्यक्ष रामू लांजेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे संचालक मुकेश गजभिये, गोपाल पटले, शरद लोहबरे, शिक्षक बागडे, माजी सरपंच कैलास वैद्य, ग्रामपंचायत सदस्य राकेश बागडे, ज्योती पाल गजभिये उपस्थित होते.







