spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

15 ऑगस्ट आणि पोलिसांची सतर्कता? महाराज बागेत 2 तास खुली डुकरे

नागपूर १८ : 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मी माझ्या मुलीला घेऊन महाराजबाग येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. मच्छालयाला भेट देऊन पशुपक्षांकडे जात असताना रस्त्याशेजारी एक पांढऱ्या रंगाचा गावरान डुक्कर व त्याची तीन पिल्ले दिसली. त्याची माहिती स्थानिक गार्ड, महिला पोलीस व पोलीस कंट्रोलला दुपारी 12.30 च्या दरम्यान दिली. त्याचे फोटो व व्हिडिओ सुद्धा पाठविले. परंतु दुपारी 2 वाजेपर्यंत त्या डुकरांचा शोध घेण्यात पोलीस व स्थानिक महाराजबाग प्रशासन नाकामी ठरले. आपले प्रशासन किती नाकर्ते आहे याचा प्रत्यय आला.
हे डुक्कर पाहताच माझी मुलगी घाबरली, अनेक मुलंही घाबरली, मी त्याचे फोटो काढून तिथल्या एका गार्ड ला हा डुक्कर येथे फिरणाऱ्या मुलांना वगैरे नुकसान पोहोचू शकतो असे सांगितले. त्यावर हे माझे काम नाही, मी पॉईंट सोडत नाही, तुम्ही कार्यालयात तक्रार करा, असे सांगितले. येथे चार महिला शिपायांचा ग्रुप येताना दिसला त्यांना थांबा मला तक्रार करायची आहे, असे म्हणताच त्यातील फक्त एक शिपाई थांबली, त्यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनीही महाराज बागेच्या कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला.
नंतर मी पोलीस कंट्रोल रूमला फोन केल्यावर माझीच सविस्तर इन्क्वारी करत बसले. आणि डुकराचा तुम्हाला काय त्रास आहे? ते कुणाला चावत आहेत का? हे सुद्धा विचारले, मी स्थानिक नागपुरातील पोलीस कंट्रोलला फोन केल्यावर त्यांनी तिथे असलेल्या शिपायाला सांगण्याचे सुचविले, त्यानंतर त्यांनी संबंधितांना कळवतो असे बोलले, नंतर बर्डी पोलिसांचा फोन आला, तुम्ही कुठे आहात, डुक्कर कुठे आहेत? त्याचे फोटो व्हिडिओ, पाठवा अशी सूचना केली.
पुन्हा त्यांना मी दीड तासानंतर म्हणजेच 2 वाजता त्या डुकराचे जिवंत व्हिडिओ व फोटो पाठविले. त्यानंतर पोलीस आणि महाराजबाग प्रशासनाचे गार्ड शोध मोहिमेवर निघाले. म्हणजे दीड तास पर्यंत हजारो लोक असलेल्या महाराज बागेत दीड तास पर्यंत डुकरांचा व त्यांच्या पिल्लाचा सर्रास वावर असतो. तोपर्यंत त्याचा प्रतिबंध केल्या जात नाही. किंवा त्यांचा प्रतिबंध करणारी यंत्रणा महाराज बागेकडे उपलब्ध नाही, जर ती डुकरे पिसाळलेली असती किंवा जर त्यांनी आपल्या पील्ल्याच्या संरक्षणात हल्ले केले असते तर कित्येक मुलं जखमी झाली असती. जर एखाद्या वेळेस वाघ सुटला तर त्याचा बंदोबस्त करणारी यंत्रणा महाराज बागेकडे आहे काय? असा प्रश्न बसपा नेते उत्तम शेवडे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

Popular Articles