spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीराने स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

 
स्वातंत्र दिनी ७० रक्तदात्यानी रक्तदान केले तर ९५ नागरिकांच्या नेत्र तपासणी व चश्मे वितरण. 
 
कन्हान १८ : – भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था द्वारे ७९ व्या स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर महाकाली काॅम्पलेक्स तारसा रोड चौक कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला .
         रक्तदान शिबीरात इंदिरा गांधी शासकीय रूग्णा लय नागपुर रक्त पेटी यांच्या चमुंच्या सहकार्याने एकुण ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी शिबीरात जगनाथ नेत्रालय सुपर स्पेशालीटी नागपुर यांच्या चमुं च्या सहकार्याने एकुण ९५ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करुन चश्मे वितरित करण्यात आले. कार्यक्र मात सामाजिक व राजकीय आणि विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थे व्दारे रक्तदान करणारे तसेच सहकार्य करणारे संपुर्ण सामाजिक व राजकीय मान्य वरांचे संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भुमिपत्र बहुउद्देशीय संस्था कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटू) वाकुड़कर, शमशेर पुरवले, रजनीश मेश्राम, सुनिल लक्षणे, आशिष वानखेड़े, अशोक नारनवरे, हरिष तिडके, भरत चकोले, पवन नानोटे, सुमेध नितनवरे, मंगेश धोटे, दीपक कुंभलकर, सचिन कटरे, केशल पवार, गणेश चौबीतकर, भरत फरकाडे, करण पाली, राम थदानि, कार्तिक पिल्ले, गुड्डा सूर्यवंशी, राजु चोप कर, जगन कारेमोरे, राधेश्याम राउत, शशिकांत दारोंडे, समिर गायकवाड़, सोमलाल पात्रे, आविश पुरवले, रितिक पात्रे आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमास कन्हान परिसरातील बहु संख्येने नागरिकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Popular Articles