spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विज कंत्राटी कामगारांवर कंत्राटदाराकडून होत असलेल्या हुकुमशाही वृत्ती विरुद्ध एल्गार

 
तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन राज्यव्यापी आंदोलन करणार :
नागपूर १८ : महावितरण मधील ३२९ उपकेद्र हे क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्हिर्सेस लिमिटेड व स्मार्ट सर्विसेस कंपनीला कामगार पुरविण्यासाठी दिले आहे. कंपनीच्या कामगार विरोधी मनमानी कारभाराला त्वरित आवरा अशा स्वरूपाचे निवेदन राज्याचे कामगार राज्य मंत्री नामदार आशिष जयस्वाल याना दिले असल्याची माहिती तांत्रिकॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन चे कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी दिला असल्याची माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिला आहे.
राज्यातील 329 उपकेंद्रामध्ये महावितरण, प्रकाशगड, मुख्यकार्यालय स्तरावरून निविदा प्रसारित करून त्याद्वारे संपुर्ण राज्यामध्ये एकाधिकारशाही व जुलमी पध्दत राबविण्याकरीता क्रिस्टल इंटिग्रटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी व स्मार्ट सींस कंपनीला कंत्राटी यंत्रचालक पुरविण्याचे कामे दिली आहे. या एकाधिकारशाहीला अगोदरसुध्दा संघटनेन तिव्र विरोध दर्शविला होता. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी व ईतर कंपनीची कार्यपध्दत हि आक्षेपार्ह आहे. काम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी या कंपनीने कामगारांचे वेतन अदा (तिन ते चार महीन्यापासुन) केलेले नाही. त्यांच्यावरील होत असलेल्या शोषणाच्या बातम्या निश्चीतच विचलित करणाऱ्या आहेत. त्यांची प्रतिमा जनमानसात पुर्णपणे मलीन आहे. अशा कामगारव्देषी व कायद्याचे पालन न करणाऱ्या कंपनीला काम दिल्याने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.
या कंपन्यानी आता संपुर्ण महाराष्ट्रातील उपकेंद्रामध्ये यंत्रचालक पुरविण्याच्या कामास सुरूवात करण्यापुर्वी सद्य स्थितीत कार्य करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना संपर्क साधणे सुरू केले आहे. होत असलेल्या संपर्कातुन अनेक अन्यायकारक बाबी पुढे येत आहे.
यामध्ये सद्य स्थितीत कार्य करीत असलेल्या उपकेंद्रातील कंत्राटी कामगारांना परत कंपनी च्यावतीने कामावर घेण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, कंत्राटी कामगारांना विविध माध्यमातुन भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, कंत्राटी कामगारांचे काम सुरू होण्या अगोदरच राजीनामा पत्र लिघुन घेतल्या जात आहेत ,कंत्राटी कामगारांवर विशिष्ट संघटनेचे सभासदत्व स्विकारण्याकरीता दबाव टाकण्यात येत आहे. तसेच सभासदत्व स्विकारल्यानंतरच आदेश देण्यात येईल असे कळविण्यात येत आहे, कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारची आठवडा सुट्टी व ईतर लाभ मिळणार नाही अशा पध्दतीचे नियमबाहय करारनामे जबरदस्ती लिहुन घेतल्या जात आहेत अश्या सगळ्या असंविधानिक बाबी कंत्राटी कामगारावर लादण्यात येत आहे. या हुकूमशाही वृतीला त्वरित शासनाने आळा घालावा. अशी मागणी राज्याचे कामगार राज्यमंत्री अँड.आशिष जयस्वाल याना तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन च्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, प्रादेशिक अध्यक्ष अनिवेश देशमुख, नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख निशांत काळसर्पे, नागपूर जिल्हा सचिव विकास ठुसे, प्रफुल डोये, विपुल चकोले, मयूर कटारे, अमित गोमकाळे, मिलिंद कडू, विशाल देशमुख आदी कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles