spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन

भदंत ससाई यांच्या हस्ते ध्वजारोहण

संविधान चौक, विमानतळ परिसरात मानवंदना

नागपूर, १८ :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी येथे ध्वजारोहन करण्यात आले. एनसीसीच्या पथकाने बॅन्ड संचालनात अध्यक्ष ससाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा पान्हेकर यांना सन्मानाने व्यासपीठापर्यंत घेऊन गेले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
भदंत सुरेई ससाई यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केल्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी भीम गीत सादर करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ससाई यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी एनसीसीच्या पथकाने राष्ट्रगीत सादर केले. यावेळी समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा पान्हेकर, उपप्राचार्या, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
यांनंतर ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक, विमानतळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भंते नागवंश, भंते नागसेन, भंते अश्वजित, भंते संघ, भंते शीलवंश, भिक्खुनी संघमित्रा, संघप्रिया, धम्मसेनेचे रवी मेंढे, नन्हा सवाईतुल, धीरेश बोरकर, अशोक गोवर्धन, आतिश शेंडे, प्रवीण सहारे, अमन मेश्राम, अमोल जनबंधु, मितांश सवाईथुल, अयान सवाईथुल, ओमकार अंबाडे, विनीत घरडे, अमन धनवटे यांच्यासह उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Popular Articles